शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

राज्यघटनेला बाजूला ठेवून देशात कारभार : वसंत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:08 IST

बेळगाव : राज्यघटना बाजूला ठेवून समांतर कारभार सध्या देशात सुरू असल्याचे चित्र आहे आणि लोकशाहीसाठी ते अत्यंत घातक आहे, ...

ठळक मुद्देयामुळे सामाजिक विषमतेची मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे.समितीचे ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांच्यासारख्यांनी त्यासाठी आपले आयुष्य वेचले आहेबेळगावबाहेरच्या मराठी भाषिकांचीही साथ आहे असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते

बेळगाव : राज्यघटना बाजूला ठेवून समांतर कारभार सध्या देशात सुरू असल्याचे चित्र आहे आणि लोकशाहीसाठी ते अत्यंत घातक आहे, त्यामुळे वेळीच सावध व्हायला हवे, असे मत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

येथील ज्योती महाविद्यालयात दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि दि सह्याद्री को-आॅप. सोसायटी लिमिटेडच्या वतीने महात्मा जोतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित महात्मा फुले व्याख्यानमालेतील ‘राज्यघटना आणि सद्य:स्थिती’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफतानाभोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी बेळगाव दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजाभाऊ पाटील होते.

भोसले म्हणाले की, गेल्या काही वर्षांत संविधान बचाव आंदोलन सुरू झाले आहे. याला कारण सरकारचा व्यवहारच संशयास्पद वाटतो आहे. एवढेच नाही, तर राज्यघटनेचा वापर निवडणुकीपुरता करून आपल्याला हवा तसा कारभार चालविता येईल अशी समांतर व्यवस्था आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचे सध्याचे देशातील चित्र आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांशी फारकत सुरू आहे. त्यामुळे घटना बदलणे किंवा त्यामध्ये सुधारणा या गोष्टी आता मागे पडल्या आहेत.

राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता, सर्वांना शिक्षण आणि विकासाची संधी देण्याच्या तत्त्वांबाबतही असेच चित्र आहे. सर्वसामान्यांसाठी शिक्षण आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे, तोच शिक्षण घेणार आणि पुढे जाणार आहे. यामुळे सामाजिक विषमतेची मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे.

महाराष्ट्र शेतकऱ्यांची स्मशानभूमी बनल्याचे वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी अलीकडे केले आहे. यावरून शेतकºयांची अवस्था लक्षात येते. शेती, शेतकरी, कामगार व असंघटित कामगारांसह रोजंदारी कर्मचाºयांची स्थिती चिंतनीय झाली आहे. समाजातील ७० टक्के वर्गाची अशी स्थिती झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर समाजात विघटन होण्याचा मोठा धोका आहे, असा इशाराही भोसले यांनी दिला.

तत्पूर्वी म. फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यांनी महिलांना समान हक्क कधी मिळणार असा सवाल शबरीमाला, शनिशिंगणापूर यासारखी महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या लढ्याची उदाहरणे देऊन केला. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीपक दळवी यांना अश्रू अनावरसंपादक वसंत भोसले यांनी आपल्या व्याख्यानात सीमाप्रश्न आणि काश्मीरच्या प्रश्नाने मी व्यथित होतो, असे सांगून मराठी भाषिक बहुसंख्येने असल्याने महाराष्टत सामील होण्याचा त्यांचा हक्क डावलला गेला आहे. तो मिळविण्यासाठी महाराष्टÑ एकीकरण समितीचा लढा अव्याहतपणे सुरू आहे. समितीचे ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांच्यासारख्यांनी त्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे, असे सांगताच श्रोत्यांमध्ये असलेले दीपक दळवी अत्यंत भावुक झाले. व्याख्यानानंतर व्यासपीठावर येऊन त्यांनी संपादकांना आलिंगन दिले. आपल्या लढ्याला बेळगावबाहेरच्या मराठी भाषिकांचीही साथ आहे असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. सीमाप्रश्नासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत लढत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :belgaonबेळगावmarathiमराठीkolhapurकोल्हापूर